| नेरळ | वार्ताहर |
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांतर्गत माझी माती माझा देश या उपक्रमामध्ये पंचायत समिती कर्जत येथे अमृत कलश यात्रेचे आयोजन केले. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमधून संकलन केलेली मातीच कलश पंचायत समिती कर्जतच्या आवारात गोळा करण्यात आला. मातीचे कलश व तालुका स्तरावरील कलश अमृत रथामध्ये ठेवण्यात आले. तालुकास्तरीय अमृत कलशाची वाद्यवृंदासमवेत जयघोषात मिरवणूक काढण्यात आली. कर्जत पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सुहास गरड यांचे हस्ते हिरवा झेंडा दाखवून अमृत कलश यात्रेला सुरुवात झाली. यावेळी पंचायत समितीचे प्रशासक चंद्रकांत साबळे, पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोरवे, सुषमा ठाकरे, संतोष भासे, दीपाली पिंगळे, उषा पारधी, संकेत भासे, प्रसाद थोरवे, यांच्यासह कर्जत पंचायत समितीचे कार्यालयीन अधीक्षक, सर्व विस्तार अधिकारी, खाते प्रमुख या कलश यात्रेत सहभागी झाले होते.




