| अलिबाग | प्रमोद जाधव |
अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाच्या खिडकीचा स्लॅप कोसळण्याची घटना शनिवारी (दि. 4) दुपारी दिडच्या सुमारास घडली. यामध्ये उरणचे दोघेजण जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.
उरणचे विनोद मंगल्या पारधी, ज्ञानेश्वर पारधी हे दोघेजण नातेवाईकांना बघण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आले हेोते. यावेळी जिल्हा रुग्णालयाबाहेर बोलत असताना रुग्णालयाच्या खिडकीचा स्लॅप त्यांच्या अंगावर कोसळला. यामध्ये त्यांना दुखापत झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. जिल्हा रुग्णालयात स्लॅप कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असून रुग्णांसह नातेवाईकांच्या सुरक्षेचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे.
इमारतीच्या बाहेर दोघेजण बसलेले होते. त्यावेळी दुपारी त्यांच्या अंगावर पहिल्या मजल्यावरील खिडकीवरील स्लॅब कोसळला. त्यांना उपचारासाठी दाखल केले आहे.या घटनेची माहिती मिळताच तातडीने रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधला. जखमींची विचारपूस केली. एक्सरे काढण्याच्या सूचना डॉक्टरांना दिल्या आहेत. सिटीस्कॅनमशीनची एक्सरे ट्यूब खराब झाली आहे. तिची किंमत 38 लाख रुपये आहे. रिलायन्स कंपनीमार्फत दिली जाणार आहे. त्यामुळे आठवड्याभरात सिटीस्कॅन मशीन सुरु होण्याची शक्यता आहे.
आंंबादास देवमाने, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग