। रसायनी । वार्ताहर ।
मोहोपाडा बाजारपेठेत शिस्त राहिली नसल्याने वाहतूक कोंडीसह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे ग्रुप ग्रामपंचायत वासांबे-मोहोपाडा आणि स्वच्छता समिती यांच्यातर्फे ‘माझी वसुंधरा 5.0’ अंतर्गत मोहोपाडा मुख्य बाजारपेठेतील दुकानदारांना स्वच्छता, प्लास्टिक बंदी आणि दुकानाव्यतिरीक्त जागा पूढे सरसावू नये यासाठी शिस्तीचे धडे देण्यात आले.
यावेळी दुकानदार, वाहनचालक, फेरीवाले यांना प्रबोधन करण्यात आले. प्लास्टिक बंदी पाळावी असे आवाहन करीत 1 जानेवारीपासून प्लास्टिक आढळल्यास दंडात्मक करावाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच, कोणीही दुकानदारांनी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पांढर्या पट्ट्याच्या पुढे दुकान लावल्यास ग्रामपंचायतीकडून कारवाई करण्यात येणार आहे. ग्राहकांनीही दुकानासमोर अस्ताव्यस्त वाहने लावू नयेत आदी सूचना यावेळी करण्यात आल्या.
यावेळी वासांबे-मोहोपाडाच्या सरपंच उमा मुंढे, ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील, सदस्य आकाश जुईकर, रसिका खराडे, प्रतिक्षा राऊत, वेदीका पाटील,केदार भोईर, स्वप्नाली मैंदर्गीकर, दीपक कांबळे, संगीता भोईर, प्रशाली खाने, कविता मांडे, माया पाटील, मयुरा गोपाळे, संतोष मैदर्गीकर, विवेक ओक, गणेश काळे, आशिष जाधव, प्रदीप पाटील, मनोज सोमाणी, अमित शहा व ग्रामपंचायतीचे कार्यालयीन व स्वच्छता कर्मचारी सहभागी झाले होते.