| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील बेलोशी येथील अभिजात स्पोर्टस यांच्या वतीने मर्यादित षटकांचे टेनिस ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार 11 व रविवार 12 नोव्हेंबर रोजी ही स्पर्धा वळवली येथील मैदानात सकाळी नऊ वाजता होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, रायगड, काँग्रेसच्या जिल्हा महिला अध्यक्षा ॲड. श्रध्दा ठाकूर, जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र ठाकूर, युवा सेना रायगड जिल्हा समन्वयक अमिर ठाकूर, अलिबाग पंचायत समितीचे माजी सदस्य श्रीधर भोपी, सरपंच कृष्णा भोपी, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, पुरोगामी युवक संघटना तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेत एकूण 24 संघ सहभागी होणार आहेत. प्रथम क्रमांकास रोख 12 हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकास रोख सात हजार रुपये व चषक, तृतीय क्रमांकास रोख चार हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. उत्कृष्ठ गोलंदाज, उत्कृष्ठ फलंदाज, मालिकावीर खेळाडूला चषक देऊन सन्मानित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. स्पर्धेत प्रवेश घेण्यासाठी दीड हजार रुपये शुल्क आहे. सामने गाव टु गाव खेळवले जाणार आहेत. प्रथम येणाऱ्या 24 संघाला प्राधान्य दिले जाईल, असे नियम लागू करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सारंग वादळ, अनिरुध्द पाडगे, प्रज्वल वादळ, आस्वाद चोगले यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे