| अलिबाग| वार्ताहर |
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील डेव्हीड इंग्लीश मिडीअम स्कूलची विद्यार्थीनी आराध्या बिपीन भगत हीने यश संपादन केले. गांधीवादी विचारवंत बाळासाहेब भारदे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त शेवगाव येथील भारदे साक्षरता प्रसारक मंडळाच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली होती. यंदा स्पर्धेसाठी राज्यभरातील 60 शाळांतील 75 स्पर्धक सहभागी झाले होते. इयत्ता चौथी ते सहावीसाठीच्या लहान गटात सहभागी झालेल्या 30 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात अलिबाग तालुक्यातील डेव्हीड इग्लिंश शाळेतील आराध्या भगत हिने व्दितीय क्रमांक पटकाविला. तिच्या यशाबद्दल तिचे सर्वस्तरातून कौतूक करण्यात येत आहे.