नोंदणी करण्याचे रमेश मोरे यांचे आवाहन
| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे भात खरेदीसंदर्भात नोंदणी सुरु करण्यात आली आहे. माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा, तळा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती माणगाव सभापती रमेश मोरे यांनी केले आहे.
भात खरेदी नोंदणी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे करण्यात येणार असून, प्रतिक्विंटल 2183 रुपये इतका हमीभाव देण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी सातबारा, बँक पासबुक, आधारकार्ड, 8 (अ) व स्वतःचा मोबाईल आणणे आवश्यक आहे. सरकारतर्फे देण्यात येणारा बोनस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल, अशी माहिती श्री. मोरे यांनी दिली आहे.







