दोन संघांना रौप्य, एका संघाला कांस्य
| रसायनी | प्रतिनिधी |
आइस स्टॉक राष्ट्रीय स्पर्धा 2023 मध्ये रायगड जिल्ह्यातील संघांनी यशस्वी कामगिरी केली आहे. या स्पर्धेमध्ये दोन संघांनी रौप्य पदक तर एका संघाने कांस्य पदक पटकावले आहे. विजयी खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.
आइस स्टॉक राष्ट्रीय स्पर्धा 2023 श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे आयोजन आइस स्टॉक सीनियर राष्ट्रीय प्रेसिडेंट महेश राठोड, आइसस्टॉक असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे चेअरमन बाळासाहेब सरनाईक यांनी केले होते. या स्पर्धेचे उदघाटन सिक्किमचे माजी राज्यपाल तसेच सातारा जिल्ह्याचे माजी खासदार श्रीनिवासन दादासाहेब पाटील यांनी केले.
आइसस्टॉक हा खेळ खेलो इंडिया मान्यताप्राप्त हिवाळी खेळ आहे.पूर्वी हा खेळ फक्त बर्फात उत्तर पूर्व भारतामध्ये खेळला जात होता. आता त्याचा उन्हाळी प्रकार तयार करण्यात आला आहे. पूर्ण देशभरातून या खेळाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये देशभरातून जवळपास 20 राज्यातील 300 हुन अधिक निवडक खेळाडूनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्रामधील खेळाडू संघांनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत रौप्य आणि कांस्य पदकाची कामे केली आहे. विजयानंतर देशभरातील खेळाडूंना पदक देऊन गौरविण्यात आले.
यामध्ये रायगड जिल्ह्यातील संघांपैकी वरिष्ठ पुरुष गटात कांस्यपदक, वरिष्ठ मुलींच्या गटात रौप्य पदक आणि युवा गटात रौप्य पदक मिळाले.यामध्ये कांस्य पदक विजेते वरिष्ठ पुरुष गटात भूपेंद्र गायकवाड, दीपक चलवाड़ी, ओंकार गावडे, साहिल गुजर. रौप्य पदक विजेते युवा मुलांमध्ये आदित्य खंडिझोड, दिव्यांक कुंभार, आयुष कांबळे, केदार खांबे, प्रथमेश सातपुते आणि वरिष्ठ मुलींच्या गटात धनेशा शिंगोटे, दिक्षा जैन, संस्कृती घरत, सिद्धी मुसळे यान्नी रौप्य पदक पटकावले.