| मुंबई | प्रतिनिधी |
सार्वजनिक क्षेत्रातील तेल विक्रेत्या कंपन्यांनी शुक्रवार, 1 डिसेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती 21 रुपयांनी वाढवल्याचे वृत्त आहे. दर वाढीनंतर, 19 किलोग्राम व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत नवी दिल्लीमध्ये 1,796.5 रुपये आणि मुंबईमध्ये 1,749 रुपये करण्यात आली आहे.
चेन्नईमध्ये किंमत 1968.5 रुपये असेल तर कोलकातामध्ये 1908 रुपये करण्यात आली आहे. हे दर आजपासून लगेचच लागू करण्यात येणार आहेत.
दरम्यान, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यापूर्वी 16 नोव्हेंबरला व्यावसायिक एलपीजीच्या किमती 57 रुपयांनी कमी झाल्या होत्या.
आता राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोरम या राज्यांमध्ये मतदान पूर्ण होताच पुन्हा एकदा व्यावसायिक गॅस सिलेंडरचे भाव वाढवण्यात आले आहेत. येत्या 3 डिसेंबर रोजी पाच राज्यांच्या निवडणुकांचा शेवटचा टप्पा म्हणजेच मतमोजणी व निकाल असणार आहे.