| पनवेल | वार्ताहर |
मध्य रेल्वेचे अत्यंत महत्वाचे व मध्यवर्ती स्थानक असलेल्या खांदेश्वर रेल्वे स्थानकाच्या सल्लागार समितीवर संजय जैन यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र जैन यांना नुकतेच मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई येथील मंडळ कार्यालयातील वरिष्ठ व्यवस्थापक जितेंद्र यादव यांच्या कडून देण्यात आले. या स्थानकातील प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेणे, त्यावर उपाययोजना करणे, सार्वजनिक हिताचा व सार्वजनिक सोयीचा कोणताही विषय, प्रवाशांना सेवा सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणे अशा विविध समस्या सोडविण्याचे काम ही कमिटी करत असते. जैन यांची निवड झाल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.