| अयोध्या | वृत्तसंस्था |
राम मंदिराच्या उद्घाटनदिनी 22 जानेवारीला देशभरात दिवाळी साजरी करावी. तसेच घरोघरी रामज्योती पेटवावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले.
अयोध्येत शनिवारी मोदींच्या हस्ते अयोध्येतील रेल्वेस्थानक, नव्या विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले. सहा वंदेभारत आणि दोन अमृत भारत रेल्वेला त्यांनी हिरंवा झेंडा दाखवला. तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आयोजित सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. 22 जानेवारी रोजी विधीपूर्वक कार्यक्रम झाल्यानंतर 23 जानेवारीनंतर आपल्या सोयीनुसार अयोध्येत यावे. साडे पाचशे वर्षे आपण वाट पाहिली, काही दिवस अजून वाट पाहुयात, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.