| पाली | गोमाशी |
एस आर सर्टिफिकेटच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील नाडसुर ग्रामपंचायतीला आयएसओ 9001:2015 हे मानांकन प्राप्त झाले आहे. सुधागड तालुक्यातील नाडसुर ही पहिली ग्रामपंचायत की तिला आयएसओ मानांकन प्रमाणित होण्याचा मान मिळाला. हे प्रमाणपत्र ग्रामपंचायतीला प्रधान करीत असताना आयएसओ लीड ऑडिटर किरण भगत, गटविकास अधिकारी सरिता मोहिते, विस्तार अधिकारी सुनिल अहिरे, ग्रामसेविका प्रणाली पाटील, सरपंच श्याम खंडागळे, उपसरपंच ललिता ठोंबरे, माजी सरपंच महेश जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.







