| तळा | वार्ताहर |
तळा तालुक्यासह रायगड जिल्ह्याभरातील शेतकर्यांच्या खात्यात पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा परतावा रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकरी समन्वय समितीने केलेल्या साखळी उपोषणास आलेले हे मोठे यश आहे. जिल्ह्यातील 7500 शेतकर्यांनी पुनर्रचित फळ पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता त्यापैकी 3500 शेतकर्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यात आली भारतीय कृषी विमा कंपनीने 2940 शेतकर्यांची नऊ कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम अदा केली नव्हती.
तळातालुक्यात कृषी खाते आणि विमा कंपनी यांचा समन्वय नसल्याने तळा महसूल मंडळाच्या विभाजनाच्या मुद्यावरून विमा प्रलंबित राहिल्याने शेतकरी आक्रमक झाले होते 990 रुपयांनी नुकसान भरपाई मिळत नाही तो पर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी शेतकर्यांची भूमिका होती ही रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी शेतकरी नेते चंद्रकांत राऊत, कैलास पायगुडे, रवी मांडवकर यांनी शेतकर्यांच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता.







