| सुकेळी | वार्ताहर |
ऐनघर ग्रामपंचायत हद्दीमध्ये कार्यरत असलेल्या बी.सी.जिंदल चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णालय सुकेळी यांच्यावतीने जवळपास 16 ते 17 वर्षांपासून जिंदलच्या फिरत्या दवाखान्यामामार्फत ऐनघर पंचक्रोशीसह खांब, वाकण, पाली परिसरातील गावांमध्ये जाऊन गोरगरीब रुग्णांची तपासणी करुन मोफत औषधे देण्याचे काम जिंदलच्या या फिरत्या दवाखान्यामार्फत सुरु आहे. त्यामुळे त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विभागातील जनतेचे आरोग्य उत्तम रहावे याकरीता जिंदल कंपनीचे चेअरमन डी.पी. जिंदल यांच्या सहकार्याने बी.सी.जिंदल रुग्णालयामार्फत फिरता दवाखाना सुरू करण्यात आला आहे. सद्यपस्थितीत वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. त्यातच थंडीचे प्रमाणदेखील वाढल्यामुळे अशा वातावरणात नागरीकांच्या आजारपणात मोठी वाढ झाल्याची परिस्थिती पहावयास मिळत आहे. त्यामुळे जिंदलच्या या फिरत्या दवाखान्याला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या फिरत्या दवाखान्याचे कौतुक केले जात आहे.