रामायण, छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी, प्रसंग, नृत्य सादर
| माणगाव | वार्ताहर |
शाळा महाविद्यालयातून स्नेहसंमेलनाचे पर्व सुरू आहेत. शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील स्नेहसंमेलनात छत्रपती शिवाजी महाराज व रामायण आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची झळक आवर्जून दिसत आहे. स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सादरीकरण असते. अंगीभूत कलागुणांना प्रोत्साहन देणे, कलागुणांना वाव देणे भारतीय संस्कृतीची ओळख करून देणे हा हेतू असतो. स्नेहसंमेलनात संस्कृती व ऐतिहासिक झळक सादर होत असल्याने सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी,पालक यांनी समाधान व्यक्त केले आहे.
शाळा महाविद्यालयातून रामायण आधारित तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित विविध गाणी, प्रसंग, नृत्य यांचे सादरीकरण होत आहे. अयोध्यामध्ये श्रीरामाच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी रोजी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालयातून रामायणातील विविध प्रसंग तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंग नाटिका, गीते, नृत्य यांचे सादरीकरण होताना दिसत आहे.
या सादरीकरणातून रामायणातील विविध प्रसंगांचे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील विविध प्रसंगाच्या सादरीकरणातून पौराणिक,धार्मिक कथा व ऐतिहासिक प्रसंग जीवित होत आहेत. यातून विद्यार्थ्यांसह समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती तसेच पौराणिक कथामूळे धार्मिक, सांस्कृतिक वातावरण निर्मिती होत आहे.
शाळा महाविद्यालयात पौराणिक कथांचे सादरीकरण तसेच ऐतिहासिक प्रसंगाचे सादरीकरण होत असल्याने शैक्षणिक क्षेत्रातून तसेच सामाजिक क्षेत्रातून या बाबींचे कौतुक होत आहे. पौराणिक कथांमुळे तसेच ऐतिहासिक प्रसंगांच्या सादरीकरणामुळे नवीन पिढीला पौराणिक, ऐतिहासिक कथांची माहिती होत आहे हे भारताच्या सांस्कृतिक दृष्टीने महत्त्वाचे आहे.
यावर्षी रामायण आधारित व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग, गीते, पोवाडे इत्यादी बाबींचा समावेश होतो आहे. यामुळे स्नेहसंमेलनातून इतिहास जागृती होत आहे. ही बाब चांगली असून यामुळे देशप्रेम जागृती होत आहे.
अरुण पाटील
मुख्याध्यापक