| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाची वार्षिक सर्वसाधारण बैठक पत्रकार दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडली. यावेळी सन 2024 सालाकरिता कार्यकारिणीची बिनविरोध निवड जाहीर झाली. मंचच्या अध्यक्षपदी विवेक मोरेश्वर पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, अविनाश कोळी आणि संजय सोनावणे सल्लागार, हरेश साठे सरचिटणीसपदी, संजय कदम उपाध्यक्षपदी, नितिन कोळी खजिनदारपदी, मंदार दोंदे कार्यकारिणी सदस्य, राजेंद्र पाटील, प्रविण मोहोकर, राजू गाडे, दीपक घोसाळकर, तृप्ती पालकर, भरतकुमार कांबळे यांनी निवड करण्यात आली आहे.
पनवेल तालुका पत्रकार विकास मंच गेल्या अठरा वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून शैक्षणिक, सामाजिक कार्य करीत आहे. दरवर्षी विविध शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, कुष्ठरुग्णांसोबत दिवाळी साजरी करणे, कर्तृत्वान महिलांचा सत्कार, मातृभाषा दिन, ब्लँकेटचे वाटप असे अनेक उपक्रम राबवित आहे.







