| नागोठणे | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील नागोठणे जवळील निडी येथील प्रसिध्द कडवे वाल संपूर्ण रायगड जिल्ह्यांसह राज्यात प्रसिद्ध आहेत. खाण्यास अतिशय चविष्ट असल्याने दरवर्षी निडी येथील वालाची राज्यातील विविध भागात मागणी वाढत आहे. मात्र, वातावरण बदलामुळे अधूनमधून होत असलेल्या अवकाळीमुळे निडी येथील वालाची शेती धोक्यात आली आहे. त्यामुळे येथील वालाचे उत्पन्न घटण्याची शक्यता बळावली आहे. अवकाळीमुळे सध्या जे वालाचे पिक तयार झालेले होते ते पुर्णपणे खराब होण्याची भीती शेतकरी वर्गांनी वर्तवली आहे. त्यामुळे केवळ वाल शेतीवरील उत्पन्नावर अवलंबून असलेल्या गरीब शेतकरी मेटाकुटीला येणार आहेत.







