दर वर्षी जातो नाहक मुक्या पक्ष्यांचा बळी
| पाताळगंगा | वार्ताहर |
जानेवारी या महीन्याची चाहुल लागताच अनेकांना वेड लागते ते पंतगाचे. या पार्श्वभूमीवर बाजार पेठेत विक्री होत असून पतंग मांजासह दाखल झाले आहेत. परंतु या पतंग बाजीसाठी वापरण्यांत येणारा मांजा हा अनेकवेळा पक्ष्यांच्या जीवावर बेतणारा ठरत असल्यांचे दृश्य दर वर्षी पहावयास मिळत आहे. पतंगांच्या काटाकाटीमध्ये आपणच जिंकावे या उद्देशाने अनेकजण मांजाचा वापर करतात. यामुळे या धाग्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो.
मकर संक्रांतीच्या निमित्ताने बाजारात सध्या वेगवेळया रंगाच्या, आकाराचे पतंग दाखल झाले आहेत. आकाशात पतंगांची गर्दी असते. संक्रांत एक दिवसांची असली तरी पतंगबाजी महिनाभर चालते. पतंग मांजासह झाडांच्या फांद्यात अथवा विजेच्या तारांमध्ये राहिल्यामुळे त्याच्या संपर्कात आल्यास पक्षी आणि छोटे प्राणी या मध्ये जायबंध होतात किंवा जीवाला मुकतात.
हे टाळण्यासाठी पतंगबाजीची मजा ही लुटता आली पाहिजे, आणि प्राणी व पक्षी यांचा जीवही वाचला पाहिजे असे दुहेरी उद्दीष्ट साध्या करण्यासाठी यंदा पतंगांच्या शौकिनांनी साध्या सुती धाग्याचा वापर करावा म्हणजे त्यांचा शौक पक्षांच्या जीवावर बेतणार नाही. पतंग उडवितांना चायनीज अगर कोणताही धारदार मांजा न वापरता सुती दोरा वापरावे असा सल्ला पक्षी मित्र देत आहे.