| उरण | वार्ताहर |
भरत मढवी यांना जेएनपीटीमध्ये सिनियर मॅनेजर या पदावर बढती मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 1989 साली जे एन पी टी साठी झालेल्या भरती परीक्षेमध्ये त्यांनी पहिला क्रमांक मिळवून नोकरीत रुजू झाले होते.
तालुक्यातील जसखार गावातील अत्यंत गरीब परिस्थितीत जन्माला आलेले भरत मढवी यांचे वडील रामदास मढवी हे दुसऱ्यांच्या शेतावर आणि आगरांवर मजूर म्हणून काम करत असत. हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढून देखील शिक्षणाची आस त्यांनी सोडली नाही. शिक्षणाची आवड आणि मार्गदर्शन त्यांना त्यांचे मोठ भाऊ प्राचार्य एच.आर. मढवी यांनी केले. लहानपणापासून अभ्यासात हुशार असलेले भरत मढवी यांनी दहावीच्या परीक्षेत पैकींच्या पैकी गुण मिळवून एक आगळाच विक्रम केला होता. परंतु, परिस्थितीमुळे नोकरी करून शिक्षण करत राहिले.
आपल्या प्रामाणिक कार्य शैलीमुळे त्यांचा परिचय सर्व कामगार आणि अधिकारी यांना होता. त्यांनी चेअरमन ऑफिस, पोर्ट प्लानिंग, फायनान्स, मार्केटिंग, ट्रैफिक आणी एचआर अशा अनेक विभागांमधील कामाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. विभागातील विभाग प्रमुखांनी त्यांच्या कामाचे नेहमीच कौतुक केले होते. तसेच अनेक चेअरमन यांनी देखील त्यांच्या कामाची पोचपावती विविध अवॉर्ड देवून केली होती. आज त्यांची सीनिअर मॅनेजर पदी नियुक्ती झाल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. त्यांची दोन्ही मुले इंजिनियर असून चांगल्या पदावर कार्यरत आहेत. या यशामध्ये त्यांच्या पत्नी विशाखा यांचा मोठा वाटा आहे.
दरम्यान, मोठे भाऊ प्राचार्य एच.आर.मढवी आणि वहिनी पुष्पलता मढवी यांनी त्यांना लहानाचे मोठे करताना जे कष्ट घेतले ते कधीही विसरता येणार नाहीत या यशाचे संपूर्ण श्रेय त्यांचेच आहे, असे भरत मढवी यांनी सांगितले.
भरत मढवी यांचे जेएनपीएचे ट्रस्टी दिनेश पाटील, रवी पाटील आणि भूषण पाटील तसेच सुधाकर पाटील (अध्यक्ष उरण सामाजिक संस्था), संतोष पवार (सामाजिक कार्यकर्ते), दिनेश घरत (अध्यक्ष प्रकल्पग्रस्त शैक्षणिक संस्था), आर.पी. क्लब जसखार यांनी विशेष अभिनंदन केले.