| गडब | वार्ताहर |
पेण तालुक्यातील गडब खार माचेला येथील श्रीराम मंदिराच्या प्रांगणात कोठेकर बंधू प्रतिष्ठान व श्रीराम क्रीडा मंडळ खारमाचेला यांच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा, आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सामाजिक कार्यकर्ते प्रसाद भोईर यांच्या हस्ते आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. आरोग्य शिबिरासाठी पनवेल येथील डॉ. संजय तार्लेकर यांच्या सुश्रुषा स्पेशॅलिटी हॉस्पिटलचे सहकार्य लाभले. यावेळी 200 ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
दुपारच्या सत्रात माजी सहा. आयुक्त उत्पादन शुल्कचे सुहास पाटील यांनी विद्यार्थ्यांना करिअरमधील विविध संधी व त्यासाठी कसा प्रवेश घ्यावा, याचे मोलाचे मार्गदर्शन केले. संध्याकाळच्या सत्रात कोठेकर कुटुंबातील व गडब, कुसुंबळे, पिटकरी, मुंबई, रायगड परिसरातील शैक्षणिक व विविध क्षेत्रात यशस्वी कामगिरी केलेल्या 140 हून अधिक विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सत्कारासाठी आफ्रिका, केनियाहून आलेल्या दोन भगिनींचादेखील यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अलंकार कोठेकर, माजी उपसरपंच तुलशीदास कोठेकर, श्रीराम क्रीडा मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण कोठेकर, परशुराम कृष्णा कोठेकर, कोठेकर बंधु प्रतिष्ठानचे संस्थापक एकनाथ कोठेकर, माधव कोठेकर, सदाशिव गणू कोठेकर, पिटकीरी गावचे पांडुरंग कोठेकर, माजी सैनिक हरीश्चंद्र कोठेकर, स्वानंद कोठेकर, दिलीप कोठेकर, विकास कोठेकर, काशिनाथ कोठेकर तसेच मंडळाचे व कोठेकर प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वराज कोठेकर यांनी केले.