| मुंबई | प्रतिनिधी |
काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईचे माजी खासदार असून, ही जागा ठाकरे गटाला जाणार हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. मिलिंद देवरा हे काँग्रेसचे माजी खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री आहेत. दक्षिण मुंबईतून ते 2004 आणि 2014 साली निवडून आले आहेत. 2014 आणि 2019 साली त्यांना शिवसेनेच्या अरविंद सावंत यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.







