विखे समर्थक राहुल शिंदे यांचा पराभव; सहकार क्षेत्राच्या राजकारणात दमदार प्रवेश
| अहिल्यानगर | प्रतिनिधी |
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत खासदार निलेश लंके यांनी पारनेर मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवत विरोधकांना धक्का दिला. विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघातून लंके यांना 104 पैकी 64 मते मिळाली. त्यांनी भाजपचे विखे समर्थक उमेदवार राहुल शिंदे यांचा पराभव केला.
जिल्हा बँकेच्या 21 जागांपैकी यापूर्वीच 11 जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित 10 जागांसाठी सोमवारी मतदान झाले. मंगळवारी झालेल्या मतमोजणीत पारनेरची लढत विशेष प्रतिष्ठेची ठरली. या विजयामुळे निलेश लंके यांनी जिल्हा बँकेच्या राजकारणात दमदार प्रवेश केला असून, विखे गटाला राजकीय धक्का बसल्याची चर्चा आहे. या निकालामुळे अहिल्यानगरच्या सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांकडे लक्ष लागले आहे.







