| अलिबाग | प्रतिनिधी |
मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार कार्य विभाग अंतर्गत उडान महोत्सव 2024 भाऊसाहेब नेने महाविद्यालय, पेण येथे गुरुवार (दि.18) मोठ्या उत्साहात साजरा झाला. मुंबई विद्यापीठ, आजीवन अध्ययन आणि विस्तार कार्य विभागाचे संचालक डॉ. कुणाल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच भाऊसाहेब नेने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सदानंद धारप यांच्या अध्यक्षतेखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवात रायगड जिल्ह्यातील एकूण 17 महाविद्यालय व 247 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या महोत्सवामध्ये विविध स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाल्या. यापैकी सर्जनशील लेखन स्पर्धेत प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाची श्रुती पाटील हिने द्वितीय क्रमांक प्राप्त करून रजत पदक प्राप्त केले. पी.एन.पी. महाविद्यालयातून एकूण 25 विद्यार्थी सहभागी होते. पथनाट्य, पोस्टर मेकिंग, वक्तृत्व स्पर्धा अशा अनेक स्पर्धेत सहभाग घेतला होता. श्रुतीच्या या यशाबद्दल पी.एन.पी. एजयुकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, संचालक प्रा. विक्रांत वार्डे यांनी तिचे विशेष अभिनंदन केले. या महोत्सवाच्या पथनाट्य स्पर्धेसाठी अलिबागमधील प्रसिद्ध कला अभिनेते प्रतिक पानकर यांनी विशेष मार्गदर्शन केले. तसेच या महोत्सवासाठी आजीवन अध्ययन आणि विस्तार कार्य विभाग प्रमुख प्रा. वृषाली प्रवीण घरत यांनी विशेष मेहनत घेतली.