प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 20000 धावा पूर्ण
| मुंबई | वृत्तसंस्था |
भारताची भींत म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा सध्या भारतीय कसोटी संघात नाही. मात्र चेतेश्वर पुजाराने रणजी ट्रॉफी 2024 चा हंगाम गाजवत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. त्याने नुकतेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 20000 धावा पूर्ण केल्या. सुनिल गावसकर, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्यानंतर आता चेतेश्वर पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 20000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके ठोकण्याचा विक्रम देखील आपल्या नावावर केला आहे. त्याच्या नावावर आतापर्यंत 17 द्विशतकी खेळींचा समावेश आहे.