। पनवेल । प्रतिनिधी ।
संत शिरोमणी श्री निवृत्तीनाथ महाराज जन्म सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रायगड ठाणे नवी मुंबई वारकरी संप्रदायाच्या वतीने खारघरच्या सेंट्रल मैदानात भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. खरघरच्या सेंट्रल पार्क मैदानात भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला असून यात श्रीमद्भागवत महापुराण कथा वाचन तसेच राष्ट्रीय वारकरी महाअधिवेशन देखील संपन्न होणार असल्याची माहिती रविवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी मुख्य निमंत्रक ह भ प धनाजी महाराज पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, काँग्रेस पनवेल शहर जिल्हा कमिटीचे अध्यक्ष सुदाम पाटील यांच्या समवेत प्रमुख आयोजकांनी प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींना कार्यक्रमाबाबत अवगत केले.