विनय स्टार भेरसे अंतिम विजेता; आ. जयंत पाटील यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान
| अलिबाग | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बेलोशी येथील राजन क्रिकेट क्लब आयोजित शेकाप चषक ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा शुक्रवार, दि. 26 ते रविवार, दि.28 जानेवारी रोजी पार पडली. या स्पर्धेत विनय स्टार भेरसे संघ ‘शेकाप चषक 2024’चा मानकरी ठरला. आ. जयंत पाटील यांच्या हस्ते विजेत्या संघाला एक लाख रुपये रोख व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
![](http://krushival.in/grygrars/2024/01/bhai-1-1024x461.jpg)
यावेळी शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, अलिबाग पंचायत समितीचे माजी सदस्य श्रीधर भोपी, बेलोशीचे सरपंच कृष्णा भोपी, रायगड बाजारचे उपाध्यक्ष प्रमोद घासे, बेलोशी येथील को.ए.सो लोकनेते ॲड. दत्ता पाटील हायस्कूलचे चेअरमन प्रकाश खडपे, बेलोशी येथील शेकापचे नेते, अनंत थळे, सुधीर पाटील, सुशील पाटील, विक्रांत वार्डे, भास्कर भोपी, महेंद्र विद्रे, प्रमोद भोपी, द्वारकानाथ गुंड, गिरीश पाटील, संतोष भोपी, राकेश भोपी, निलेश वारगे, सदानंद दुधाळे, राजेंद्र पाटील, योगेश गुजर, रामदास शिंदे, महादेव भोपी, राजाराम पारंगे, संतोष जाधव, ममता गायकर, पल्लवी वारगे, स्नेहल वारगे, मंजुळा गायकर, प्रतीक्षा वारगे, सुरक्षा गायकर, मेघा वारगे, अंजली पाटील, वनिता मढवी, मनिषा वारगे, विशाखा वारगे, सिद्धी भोपी आदी मान्यवर, राजन स्पोर्ट्स क्लबचे सर्व पदाधिकारी, सभासद, शेकाप कार्यकर्ते, इंडिया आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, खेळाडू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेचे उद्घाटन शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, जिल्हा परिषद अर्थ माजी सभापती चित्रा पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत 26 जानेवारी रोजी पार पडले. या तीन दिवसीय स्पर्धेत 32 संघांनी सहभाग घेतला होता.
![](http://krushival.in/grygrars/2024/01/bhai-6-1-1024x461.jpg)
अंतिम सामना विनय स्टार भेरसे आणि व्हीसीएन कुरूळ या संघांमध्ये झाला. शेकापचे तालुका चिटणीस अनिल पाटील यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली. स्पर्धेतील अंतिम विजेत्या विनय स्टार भेरसे संघाला एक लाख रुपये व चषक, कुरुळ येथील व्हीसीएन संघाला द्वितीय क्रमांकाचे 50 हजार रुपये व चषक, वरसोली इलेव्हन संघाला तृतीय व बेलोशी येथील अभिजात संघाला चतुर्थ क्रमांकाचे प्रत्येकी रोख 30 हजार रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या हस्ते या विजेत्या संघांचा सन्मान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट गोलंदाज म्हणून बेलोशी संघातील अनुज चोगले आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून समीर पाटील यांना कुलर देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील मालिकावीर म्हणून बेलोशी येथील अभिजात संघातील खेळाडू सारंग वादळ याला सोन्याची अंगठी देऊन सन्मानित करण्यात आले. प्रत्येक सामन्यातील सामनावीराला चषक देण्यात आले. ही स्पर्धा युट्यूबद्वारे घरबसल्या बघता यावी यासाठी व्यवस्था केली होती. त्यामुळे दहा हजारांहून अधिक क्रिकेट रसिकांनी सोशल मीडियाद्वारे ही स्पर्धा पाहण्याचा आनंद लुटला. या स्पर्धेचे समालोचन वेदांत कंटक, कैलास कर्णेकर, निशांत पाटील, नरेंद्र भोईर यांनी केले.