। सुतारवाडी । वार्ताहर ।
द.ग. तटकरे माध्यमिक विद्यालय सुतारवाडीचे वार्षिक स्नेहसंमेलन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्ताराम मंचेकर, सरपंच सुरेश जाधव, कविता तटकरे, विनिता महाडिक, राजेंद्र अडलिकर, हरिश्चंद्र महाडिक, संतोष दळवी, पुष्पा नाकती, उत्तम कामथेकर, मनोहर साळवी, सूर्यकांत दळवी, गणेश कोदे, माणिकराव सावंत, कृष्णा तटकरे, चिंतामण दळवी, विजय सावंत, बाळकृष्ण कोदे, बाळकृष्ण आयरे, रखमा जाधव, श्रीराम काळे आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहसंमेलन प्रमुख शिवाजी मोटे यांनी केले. तर, शाळेच्या प्रगतीचा आढावा मुख्याध्यापक श्रीराम काळे यांनी स्पष्ट केला. स्नेहसंमेलनात लावणी, गणेश नृत्य, पाटलाचा वाडा, कोळी नृत्य, नाटिका तसेच अन्य नृत्य प्रभावीपणे सादर केले. कार्यक्रमास प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला.