| मुरूड-जंजिरा | वार्ताहर |
रायगड जिल्हा परिषद शाळा चोरढे मराठी, रामकृष्ण मठ मिशन व ग्रुप ग्रामपंचायत चोरढे यांच्या वतीने मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीर संपन्न झाले. मोतीबिंदू शिबिरामध्ये 248 रुग्णाची तपासणी करण्यात आली. 47 रुग्ण मोतीबिंदू ऑपरेशनसाठी रेफर करण्यात आले. या रुग्णांना मुंबईला दवाखान्यात मोफत नेण्यात येऊन त्यांच्यावर मोफत ऑपरेशन करण्यात येईल. ऑपरेशन झाल्यानंतर दोन दिवस त्यांना डॉक्टरांच्या देखरेकीखाली ठेवून त्यांना घरी सोडण्यात येते. ही संपूर्ण प्रक्रिया रामकृष्ण मठ मिशनद्वारे मोफत करण्यात येते. यावेळी 100 रुग्णांना चष्मे देण्यात आले. शिक्षकांनी केलेल्या या ग्रामस्थांच्या उपक्रमासाठी सर्व गावकर्यांकडून शिक्षकांचे, ग्रामपंचायत व रामकृष्ण मठ मिशनचे आभार मानण्यात आले. सहकार्य करणार्या सर्व ग्रामस्थांचे, रामकृष्ण मिशन संस्थेचे व सर्व विद्यार्थ्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.