एसबीसी महाड फायनलमध्ये दाखल
| पोयनाड | प्रतिनिधी |
झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित मिलिंद रविंद्र चवरकर स्मृतीचषक ज्युनियर वयोगटातील 40 षटकांच्या एकदिवसीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात एसबीसी महाड संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. रविवारी(दि. 4) झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात एसबीसी महाड संघांनी स्पोर्टी गो क्रिकेट अकॅडमी कळंबोली संघावर विजय मिळवत अंतिम सामन्यासाठी आपली जागा निश्चित केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या एसबीसी महाड संघांनी 40 षटकांच्या समाप्ती नंतर 9 गडी गमावत 240 धावा फलकावर नोंदवल्या.
महाड संघाचा सलामीवीर फलंदाज आरुष कोल्हे यांनी धुवाधार फलंदाजी करत 98 धावा काढल्या त्याला दुसऱ्या बाजून इमामुद्दीन शेख यांनी 26 श्रेयश शेडगे 21 अमर बीके यांनी 20 धावांचे योगदान संघाला दिले. स्पोर्टी गो कळंबोली संघाकडून यश देवकर यांनी 3 जयेंद्र पावसकर 2 दिव्यांश चौधरी आणि आदर्श सिंग यांनी प्रत्येकी 1 फलंदाज बाद केला.
241 धावांचे लक्ष घेऊन फलंदाजीला आलेल्या स्पोर्टी गो कळंबोली संघांनी 36 षटकांमध्ये सर्व गडी गमावत 133 धावा काढल्या. त्यामध्ये अमोघ कदम 28 आदर्श सिंग 24 धावांचे योगदान संघाला दिले. महाड कडून अमर बिके यांनी सर्वाधिक 4 प्रचिती जाधव हिने 3 इमामुद्दीन शेख, शिवा कुशवाह यांनी प्रत्येकी 2 फलंदाजांना बाद केले. महाड संघांनी सामना 107 धावांनी जिंकत अंतिम सामन्यासाठी प्रवेश केला. एसबीसी महाड संघाकडून सुरेख गोलंदाजी करणाऱ्या अमर बीके याला सामनावीर किताब देऊन गौरविण्यात आले.