| अलिबाग | प्रतिनिधी |
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे खेळविण्यात येणार्या निमंत्रितांच्या पुरुष खुल्या गटाच्या क्रिकेट स्पर्धेसाठी रायगडचा संघ निवडण्यात आला आहे. रायगडच्या कर्णधारपदाची दुरा निकुंज विठलानी याच्याकडे सोपविण्यात आली आहे. एकूण पाच सामन्यापैकी पहिल्या दोन सामन्यासाठी रायगडचा संघ बुधवारी (दि. 7) पुणे येथे रवाना होईल. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे रायगडचा गटाचा पुरुष खुल्या गटाचा संघ निवडण्यासाठी 18 व 19 जानेवारी 2024 रोजी उरण भेंडखळ येथील ठाणकेश्वर मैदानावर दोन दिवसीय निवडचाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या चाचणीत जिल्ह्यातील 120 खेळाडू सहभागी झाले होते. यातून खेळाडूं निवडून त्यांचे 3 संघ तयार करण्यात आले.
रिलायन्स नागोठणे मैदानावर प्रत्येक संघाला दोन-दोन सामने खेळण्यास देण्यात आले, त्यातून खेळाडूंची कामगिरी पाहून योगेश पवार, चंद्रकांत चौधरी, अरुण तरे यांच्या निवड समितीने रायगडचा संघ निवडला. एकूण पाच सामन्यापैकी पहिल्या दोन सामन्यासाठी 14 जणांचा रायगडचा संघ पुणे येथे रवाना होईल. रिलायन्स नागोठणे मैदानावर खेळविण्यात आलेल्या सराव सामन्यासाठी रिलायन्स नागोठण्याचे उदय दिवेकर, विश्वनाथ उतेकर यांचे सहकार्य लाभले. संदीप पाटील यांनी संपूर्ण स्पर्धेचे समन्वयक म्हणून काम पाहिले. यावेळी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते, उपाध्यक्ष प्रकाश पावसकर, प्रीतम कय्या, सुहास हिरवे उपस्थित होते.
रायगडचा संघ : निकुंज विठलानी (कर्णधार) अभिषेक श्रीवास्तव, प्रतिक म्हात्रे, देवांश तांडेल, श्रेयश कुमार, मल्हार वंजारी, रितेश तिवारी, विघ्नेश पाटील, रितेश नलावडे, विक्रांत जैन, अभय पाटील, संकेत गोवारी , श्रेयश देशमुख. राखीव : ऋषिकेश जाधव , शिवम आगरवाल, निनाद बोभाटे, प्रतित घोटसुर्वे, दिपेश नाईक, संतोष गोस्वामी, तेजस मोहिते, राहुल नवखारकर, साहिल देसाई, लौकिक पाटील, संस्कार म्हात्रे, अनिकेत मोहतो.