| अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील वायशेत येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याचे अपहरण करण्यात आले आहे. ही घटना शाळेच्या मैदानातून शुक्रवारी (दि.9) रोजी दुपारी घडली. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वायशेत येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सात वर्षांचा मुलगा इयत्ता दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. शुक्रवारी दुपारी तो शाळेच्या आवारात असताना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कोणीतरी त्याचे अपहरण केले. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. त्या मुलाचे वर्णन रंग गोरा, अंगाने सडपातळ, शाळेतला गणवेश परिधान केलेला असे आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अतूल जाधव करीत आहे. कोणाला मुलगा सापडल्यास त्यांनी 02141-222098 व 7261914889 येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.