चित्रलेखा पाटील यांचे गौरवोद्गार
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबागमध्ये होणारा क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम स्थानिक खेळाडूंसाठी एक वेगळी पर्वणी असणार आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक पारितोषिके असलेली स्पर्धा म्हणून खेळाडूंना वेगळी दिशा देणारी ठरणार आहे. या खेळातून स्थानिक खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे, असे गौरवोद्गार शेकाप रायगड जिल्हा महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी काढले.
स्व. प्रभाकर पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत यू.व्ही. स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित अलिबागमधील कुरुळ येथील आझाद मैदानावर दि. 17 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत टेनिस क्रिकेट स्पर्धेचा थरार अलिबागकरांना पहावयास मिळणार आहे. यानिमित्ताने पीएनपी चषक अनावरण आणि खेळाडूंचा लिलाव सोहळा कुरुळ येथील क्षात्रैक्य माळी समाज हॉल येथे मोठ्या जल्लोषात शनिवारी (दि. 10) रोजी पार पडला. यावेळी चित्रलेखा पाटील बोलत होत्या. त्यांच्यासमवेत पीएनपी इन्फ्राचे संचालक नृपाल पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, जिल्हा परिषद माजी सदस्य संजय पाटील, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, अलिबाग नगरपरिषदेचे माजी गटनेते, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, सासवणे सरपंच संतोष गावंड, प्रमोद घासे, अलिबाग तालुका महिला आघाडी प्रमुख प्रीती पाटील, जिल्हा सहकारी बँकेचे सिनियर मॅनेजर संदीप जगे, पुरोगामी युवक संघटना अलिबाग तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे, पीएनपी एज्युकेशनचे जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक आदींसह संघ मालक, कर्णधार उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, या खेळाचे नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने केले आहे. वेगवेगळी समिती नियोजनबद्ध काम करीत आहे.आयपीएलमध्ये अलिबागसह अन्य तालुक्यांतील खेळाडू पोहोचले पाहिजेत. त्यासाठी अशा प्रकारचे खेळ होणे गरजेचे आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी नोंदणीला खेळाडूंचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यात एक हायटेक नोंदणी झाली आहे. त्यामुळे संघ मालक आणि कर्णधारांना त्यांच्या पसंतीचा खेळाडू लिलावातून मिळणार आहे. रायगडच्या इतिहासात या खेळाच्या माध्यमातून एक वेगळी ओळख खेळाडूंची राहणार आहे. आज स्थानिक पातळीवर संघ मालकांनी लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला आहे. भविष्यात देश, जागतिक पातळीवर होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव करण्याची संधी प्राप्त व्हावी, हीच इच्छा आहे. जेणेकरून अलिबागचे नाव एक वेगळ्या उंचीवर जाण्यास अधिक मदत होईल, असे चित्रलेखा पाटील म्हणाल्या.
नृपाल पाटील यांच्या संकल्पनेतून साकारला पीएनपी चषक
25 जून 1983 च्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरूद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये झाला होता. या सामन्यात भारताने ऐतिहासिक विजय मिळवत विश्वचषकावर नाव कोरले होते. त्यावेळी देण्यात आलेला चषक आजही भारतीयांच्या स्मरणात आहे. त्याच चषकाची हुबेहूब झलक पीएनपी चषकात पाहता येणार आहे. दरम्यान, आजच्या तरुण पिढीसह खेळाडूंना त्या चषकाचे पुन्हा एकदा दर्शन व्हावे, यासाठीच रायगड बाजारचे चेअरमन, पीएनपी इन्फ्राचे संचालक नृपाल पाटील यांच्या संकल्पनेतून तशीच ट्रॉफी पीएनपी चषक या स्पर्धेसाठी तयार करून घेण्यात आली आहे. याबाबत अनेकांनी समाधान व्यक्त केल