स्नेहा पाटील यांचे पालकांना आवाहन
| आगरदांडा | प्रतिनिधी |
सध्या काही पालकांनाही असं वाटतं की आपला मुलगा-मुलगी इंग्रजी फाड फाड बोलावा. त्याकरिता काही पालक आपल्या पाल्याला मराठी शाळेत न पाठवता इंग्रजी शाळेत पाठवतात. परंतु, मराठी शाळेतूनही शिकलेले विद्यार्थीही पुढे जाऊन चांगले इंग्रजी बोलतात. याच शाळेतून चांगले विद्यार्थी घडले आहेत. तरी शहरातील पालकांनी पहिला यांचा विचार करायला पाहिजे आणि मराठी शाळेची पटसंख्या कशी वाढेल यांचा प्रयत्न केला पाहिजे. इंग्रजी शाळेत न टाकता विद्यार्थ्यांना मराठी शाळेत पाठवावे, असे आवाहन माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी मुरुड जंजिरा नगरपरिषद शिक्षण विभागाच्या वतीने मराठी शाळा क्रमांक 4 मध्ये आयोजित बालमहोत्सव कार्यक्रमावेळी केले.
यावेळी नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी दिपाली दिवेकर, माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, डॉ. मकबुल कोकाटे, संजय गुंजाळ, प्रमोद भायदे, पांडुरंग आरेकर, विजय सुर्वे, सिदेश लखमदे, पंकज बाईत, विजय सुर्वे, सीमा दांडेकर, युगा ठाकूर, उषा खोत, नैनिता कर्णिक, वैशाली कासार, अनघा चौलकर, सायली गुंजाळ, सर्व मराठी शाळेतील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ व खेळण्याचे स्टॉल लावण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेरणा चौलकर व आभार प्रदर्शन राजेश भोईर यांनी केले.