हजारो प्रेक्षकांसाठी उभ्या राहणार सुसज्ज गॅलरी
| अलिबाग | प्रतिनिधी |
पीएनपी चषक क्रिकेटचा महासंग्राम 17 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत कुरुळ येथील आझाद मैदानात रंगणार आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठया डे नाईट क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून तयारी जोरात सुरु आहे. ही स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले त्याची तयारी अंतिम टप्प्यात असून जिल्ह्याच्या नागरिकांमध्ये आणि क्रीडाप्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सुकता पहावयास मिळत आहे.
या स्पर्धेत सुपर प्लेअर्स आंबेपूर, जिजा अंश 11, ए 3 सोगाव, अमृत स्पोटर्स सासवणे, त्रिशव्या 11 वरसोली, सुरेश काका 11 वरसोली, रेड हॉर्स प्रिशा 11 नवगाव, अक्षय्या हॉटेल चेंढरे, प्रसाद 11 अलिबाग, साईकृपा साईनगर खंडाळे, 7700 जिजाऊ 11 चेंढरे, आझाद 11 कुरुळ, प्रांशी 11 रोहा, मुस्कान 11 मांडला, यशश्री बिल्डींग कंस्ट्रक्शन थेरोंडा, श्रावणी स्पोर्ट्स चौल, रुद्र वॉरिअर्स आक्षी, सिया वॉरिअर्स नागांव, नाखवा वॉटर स्पोटर्स साखर, प्रदिप स्पोटर्स साखर, रोशनशू 11 केतकीचामळा, ज्ञानी 11 नांगरवाडी, ए.बी. ग्रुप अलिबाग, आदिरा वॉरिअर्स कावाडे या 24 संघाचा सहभाग राहणार आहे. स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांकाला पाच लाख रुपये, द्वीतीय क्रमांकाला तीन लाख रुपये, तृतीय क्रमांकाला दोन लाख रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे आयोजन आयपीएल धर्तीवर नियोजन करण्यात आलेले असून गेल्या अनेक दिवसांपासून त्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यामध्ये सुसज्ज असा खेळाचे मैदान, 5 हजार पेक्षा अधिक प्रेक्षक बसतील इतकी आसन व्यवस्था, पाहुण्यांकरीता सुसज्ज स्टेज आणि खेळाडूंचे कक्ष राहणार असून सोबतीला समालोचन कक्ष उभारण्यात आले आहे. खेळाडूंसह क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी येणाऱ्यांना खाद्य पदार्थाचा आनंद घेता यावा यासाठी स्थानिकांचे 20 स्टॉल राहणार आहेत. तीन एकर जागेत दुचाकी, चारचाकी वाहनांची पार्कींग व्यवस्था करण्यात आली आहे.
पीएनपी चषक गाण्याची जोरदार चर्चा नव्या दमाचा, नव्या युगाचा क्रिकेटचा हा चेहरा नवा, नव्या लक्षाचा, शेकापक्षाचा झुंजेल आता छावा नवा.. जिंकू मनाला, साऱ्या जगाला, रोवूया झेंडा नवा…पीएनपी चषक रायगडची शान, पीएनपी चषक शेकापचा मान या गीताचे सादरीकरण करण्यात आले आहे. या गाण्याची जोरदार चर्चा तरुणांसह क्रिकेट प्रेमींमध्ये सुरु असल्याचे दिसून आले. अनेकांनी या गाण्याला पसंती देत जबरदस्त गाणं अशी चर्चा सोशल मिडीयावर रंगत आहे.
शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील निर्मित पीएनपी चषक 2024 टायटल साँग विक्रांत वार्डे यांनी संगीत दिले आहे. संगीत संयोजन सुदेश गायकवाड, रेकॉर्डीस्ट वरुण भगत, व्हाईस ओव्हर व कोरस शुभम धुमाळ, निखील पाटील, अनिल म्हात्रे, व्हिडीओ एडीट हर्षाली सानप, संकल्प केळकर यांचे राहिले असून निषाद एंटरटेंटमेंट आणि प्रोडक्शन असलेल्या या गाण्याला सोशल मिडीयातून चाहत्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. हे गीत गायक योगेश आग्रावकर यांनी गायले आहे. 13 फेब्रुवारीपासून चार दिवसांत हजारो लोकांनी गाण्याला अधिक पसंती दर्शविली आहे.