| खालापूर | वार्ताहर |
प्राथमिक शिक्षक संघाच्या खालापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यावेळी नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. त्यात तालुकाध्यक्षपदी संदीप रत्नाकर जाधव यांची निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्षपदी मारुती दासरे, खजिनदारपदी विठ्ठल देशमुख, यांची निवड करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ सल्लागार दिलीप देशमुख, माजी अध्यक्ष उमेश विचारे, संतोष पाटील, सरचिटणीस दीपक पालकर, जिल्हा उपाध्यक्ष सचिन कडू राजेश बाविस्कर, हनुमंत गाडे, शशिकांत फणसे, जगदीश मोहने, धनाजी थिटे, पांडुरंग काळे, नारायण गाडे, बळीराम चव्हाण, आबा कदम, रविंद्र भोईर, संजय चव्हाण, संजय पाटील, राजकुमार केंद्रे राम बिरादार, प्रदीप बडे विशाल गावडे आदींसह अनेक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.