। महाड । प्रतिनिधी ।
गेल्या दोन तीन दिवसापासून पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने महाड,भोर घाट मार्गावर दरडी कोसळू लागल्या आहेत. शुक्रवारी रात्री दोन वाजता वरंधा घाटातून जाणार्या मार्गावर पुणे हद्दीत दरडी कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक काहीकाळ बंद करण्यांत आली होती. पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने दरडी हटविण्याचे काम करण्यांत आल्यानंतर पुन्हा या मार्गा वरील वाहातुक सुरु करण्यांत आली आहे.
जुलैध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे वरंधा घाट मार्गाचे प्रचंड नुकसान झाले,या मार्गावर दरडी कोसळल्यामुळे सुमारे एक महिना रस्ता दुरुस्ती करीता वाहतुकीला बंद करण्यांत आला होता. दुरुस्तीनंतर हा मार्ग वाहतुकीला खुला करण्यांत आल्या नंतर अवघ्या दहा ते पंधरा दिवसाने शुक्रवारी रात्री दोन वाजता पुन्हा दरडी कोसळली.
त्यामुळे प्रवाशांनी सावधगिरीने प्रवास करावा, असे आवाहन प्रशासना कडून करण्यांत आले आहे.या रस्त्यावर दरडीचा धोका कायम स्वरुपी असल्याने या मार्गाला पर्यायी रस्ता तयार करण्यांत यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून करण्यांत येत आहे.