सीसीटीव्ही फुटेजवरून संशयिताची ओळख
| बंगळूर | वृत्तसंस्था |
कर्नाटकातील रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी (दि.01) दुपारी एक वाजताच्या सुमारास झालेल्या कमी तीव्रतेच्या स्फोटात 10 जण जखमी झाले आहेत. कॅफेचे सहसंस्थापक दिव्या राघवेंद्रा राव यांनी सांगितलं की, संबंधित अधिकाऱ्यांशी सहकार्य केले जात आहे. तसेच, जखमींना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे.
बेंगळुरुच्या ब्रुकीफिल्ड परिसरात असलेले रामेश्वरम कॅफे प्रसिद्ध आहे. एक तरुण बारा वाजताच्या सुमारास कॅफेमध्ये आला. त्याने एक छोटी बॅग कॅफेमध्ये ठेवली. 28 ते 30 वर्षांच्या तरुणाने रवा इडली खाण्यासाठी काऊंटरवरुन टोकन घेतले. पण, त्याने इडली खाल्ली नाही. त्याने छोटी बॅग तिथेच बाजूला ठेवून दिली आणि तो तेथून निघून गेला. त्यानंतर एका तासाने स्फोट झाला. कॅफेमध्ये बॅग ठेवणाऱ्या आरोपीला सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून ओळखण्यात आले आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार, आयईडी डिव्हाईस टायमरसह स्फोट घडवण्यासाठी वापरण्यात आले आहे. बेंगळुरु पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केले असून स्फोटाप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.