| उरण | वार्ताहर |
काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांना नुकताच कोकण भूमी रत्न पुरस्कार मिळाल्याने अभिनव सामाजिक सांस्कृतिक कला, क्रिडा मंडळ चिरनेर तसेच चिरनेर ग्रामस्थांनी मातोश्री मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या चिरनेर प्रिमियम लीगचे औचित्य साधून यांचा नागरी सत्कार केला. याप्रसंगी विजय खारकर, मिलिंद पाडगांवकर, मार्तंड नाखवा, वैभव पाटील, किरिट पाटील, पद्माकर फोफेरकर, अलंकार परदेशी, राजेंद्र भगत, प्रविण म्हात्रे, उमेश भोईर, रविंद्र भगत, किरण कुंभार, जगन्नाथ भगत, कमलाकर म्हात्रे, विकास म्हात्रे सह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, क्रिकेट प्रेमी उपस्थित होते. अभिनव मंडळाचे पदाधिकारी विविध जाती धर्मातील लोकांसाठी, आदिवासी बांधवांसाठी तसेच खेळाडूंसाठी सातत्याने विविध स्पर्धांचे आयोजन करत असल्याने घरत यांनी मंडळाचे कौतुक केले.