| मुंबई | प्रतिनिधी |
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे यांना मोठा बसणार असल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाचे नेते आमदार रवींद्र यांचा आज रात्री शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
कारण रवींद्र वायकर हे ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज रात्री रवींद्र वायकर यांचा शिंदे गटात प्रवेश होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.