| रसायनी । वार्ताहर ।
मुख्यमंत्री अभिनव केंद्र स्तरीय उपक्रमांतर्गत ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेत रसायनी येथील सावळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला एक नंबरचे पुरस्कार प्राप्त झाला. यासाठी शाळेतील मुख्याध्यापक राजेंद्र शिंदे आणि सहशिक्षक भिकाजी कदम यांनी खूप मेहनत घैतली. सावळे जिल्हा परिषद शाळेला हा पुरस्कार प्राप्त झाल्याने दोन्ही शिक्षकांचे ग्रामस्थांच्यावतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कामगार नेते तथा माजी सभापती गजानन माळी, सरपंच सुनील माळी, लक्ष्मण विठल माळी, माजी सरपंच संजय केदारी, उद्योगपती राम गाताडे, सीताराम माळी, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय म्हसकर, माजी उपसरपंच कमलाकर गडगे, विष्णू दळवी, गुरुनाथ केदारी, नारायण साळुंखे, विद्या विजय उपाध्याय, शालेय समिती अध्यक्ष आदींसह शिक्षक व ग्रामस्थ, पालक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.







