| माणगाव | वार्ताहर |
माणगावात शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल व तालुक्यातील विजय चॅरिटेबल ट्रस्ट माणगावतर्फे बुधवारी (दि.13) वृत्तपत्र विक्रेते नितीन मेथा यांचे हॉल जुने एसटी स्टॅन्ड जवळ माणगाव याठिकाणी मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात शंकरा आय हॉस्पिटलचे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्रकाश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी 125 रुग्णांची तपासणी करून 28 नेत्ररुग्णांना पनवेल येथे नेऊन त्यांच्यावर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
शिबीर आयोजित करण्यासाठी महेंद्र मेथा यांनी विनामूल्य जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मेथा परिवारातर्फे विजय मेथा, मनीष मेथा, विधिता मेथा यांनी विशेष आभार व्यक्त केले. शिबीर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विजय मेथा, सुप्रिया शिंदे, तनुजा हेमंत मेथा, छाया मेथा, विधिता मेथा, मनीष मेथा यांच्यासह शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेलचे डॉ. प्रकाश पाटील, डॉ. शिली वर्गीस, अश्विनी पाटील, निशा शिंदे, हर्षवी शिंदे, कल्पेश सावंत व त्यांचे सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. सदर शिबीर दर महिन्यातील एका बुधवारीआयोजित करण्यात येत असल्याने या शिबिराचा लाभ बहुजन समाजातील गरीब गरजू नेत्र रुग्णांनी अवश्य घ्यावा असे आवाहन मेथा परिवारातर्फे सामाजिक कार्यकर्ते तथा प्रसिद्ध उद्योजक विजयशेठ मेथा यांनी केले आहे.