। खांब । वार्ताहर ।
1993 पासून मेढे सारख्या ग्रामीण भागातून पत्रकारितेला सुरूवात करणारे उदय मोरे यांनी आपल्या लेखनीतून ग्रामीण जीवनातील विविध समस्यांना नेहमीच वाचा फोडून अनेकांना न्याय मिळवून दिला. अवचितगड प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्याचे दालन खुले करून अनेकांना मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या दु:खद निधनाबद्दल समाजातील विविध स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. तर रोहा प्रेस क्लबच्यावतीने त्यांना प्रेस क्लबच्या संपन्न झालेल्या सभेमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
रायगड भूषण पुरस्कार प्राप्त पत्रकार उदय मोरे यांच्या दु:खद निधनाने पत्रकारितेमधील एक तळपता सूर्य मावळला असल्याची भावना समाजमनातून व्यक्त होत आहे. यावेळी मिलिंद आष्टीवकर, अरुण करंबे, राजेंद्र जाधव, सुहास खरीवले, नंदकुमार मरवडे, उद्धव आव्हाड, विश्वजीत लुमन, शरद जाधव, रविंद्र कान्हेकर, सागर जैन, केशव म्हस्के आदी उपस्थित होते.