| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताचा दिग्गज बिलियर्ड खेळाडू पंकज अडवाणीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याचा समावेश चीनमधील शांगराव शहरातील वर्ल्ड बिलियर्ड्स संग्रहालयातील हॉल ऑफ फेममध्ये करण्यात आला आहे. पंकज अडवाणीने आत्तापर्यंत मोठे यश मिळवले आहे. त्याने गेल्याचवर्षी नोव्हेंबरमध्ये विक्रमी 26व्यांदा आयबीएसएफ वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशीपचे विजेतेपद जिंकले होते. त्याने नोव्हेंबरमध्ये बिलियर्सच्या या लाँग फॉरमॅटच्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताच्याच सौरव कोठारीला पराभूत केले होते. यासह 9व्यांदा बिलियर्सच्या या लाँग फॉरमॅटचे पंकजने विजेतेपद जिंकले होते.
पंकज अडवाणी
वर्ल्ड बिलियर्ड संग्रहालयात हॉल ऑफ फेममध्ये माझा समावेश केल्याबद्दल मला खूप अभिमान वाटत आहे. या अभूतपूर्व प्रवासात मला खूप प्रेम आणि पाठिंबा मिळाला, ज्यासाठी मी खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे.