| पाली/गोमाशी | वार्ताहर |
आनंदी वाचन संस्था पुणे व बल्लाळेश्वर देवस्थान पाली यांच्या संयुक्त विद्यमाने संत नामदेव माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव येथे नुकताच वाचन मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमादरम्यान वृषाली जोगळेकर आणि कमांडर तुळपुळे यांनी आपल्या कौशल्याच्या आधारे हसत खेळत विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला. पासवर्ड वाचन अभियानाच्या माध्यमातून धोकेबाज मुलांसाठी भन्नाट खुराकांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. या पुस्तकात भन्नाट कथा, भारी अनुभव, थोडी माहिती थोड्या गमती, हे नक्की वाचा, फोटो मधून वाचू शिकू यांचा समावेश करण्यात आला आहे.तसेच आनंदी वाचन संस्थेच्या वतीने शाळेस सहा हजारची पुस्तके भेट देण्यात आली.पासवर्ड हे पुस्तक सर्व विद्यार्थ्यांना भेट देण्यात आले त्या पुस्तकावर आधारित स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होईल.
या कार्यक्रमासाठी वृषाली जोगळेकर उपक्रम प्रमुख, आनंद अवधानी पासवर्ड प्रकाशक, कमांडर तुळपुळे, प्राचार्य संभाजी ढोपे, बल्लाळेश्वर देवस्थान सरपंच जितेंद्र गद्रे, उपसरपंच वैभव आपटे, विश्वस्त प्रमोद पावगी, विश्वास गद्रे, माधव वैशंपायन, विद्यालयातील शिक्षक वृंद आदी मान्यवर उपस्थित होते.