| रसायनी | वार्ताहर |
रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तुराडे गावाजवळ कृष्णा सुरेश कातकरी (35) या इसमाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कृष्णा कातकरी याच्या डोक्यास व डाव्या हातास, छातीत गंभीर दुखावत होऊन त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना कळताच रसायनी पोलीस ठाण्याचे मपोसई ढोणे यांनी तात्काळ भेट देऊन झालेल्या घटनेचा आढावा घेतला. मृत इसमाचे शवविच्छेदनाकरिता चौक ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले असून, मयत कृष्णा कातकरी मृत घोषित करण्यात आले. याबाबत रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली मपोसई ढोणे अधिक तपास करीत आहेत.







