आदिवासी सेवा संघाचा उपक्रम
। नेरळ । प्रतिनिधी ।
आदिवासी सेवा संघाकडून कर्जत तालुक्यातील चाहुची वाडी येथे राहणार्या आदिवासी महिलांना साडी वाटण्याचा कार्यक्रम राबवण्यात आला. गेली दोन वर्षे आदिवासी सेवा संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष बुधाजी हिंदोळा व त्यांचे सहकारी समाजासाठी विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवत असून महिला व तरुणांसाठी विशेष पुढाकार घेत आहेत. दरम्यान, गणेशोत्सवाचे औचित्य साधून संघटनेकडून साडी चोळी देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आल्याने या महिला वर्गाच्या चेहेर्यावर एक आनंद दिसून येत होता. यावेळी संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष बुधाजी हिंदोळा, उपाध्यक्ष भगवान भगत, सचिव गणेश पारधी, तालुका अध्यक्ष जैतु पारधी, भाऊ मेंगाळ, बाळु ठोंबरे यांसह सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.







