| पनवेल | वार्ताहर |
पोलीस असल्याची बतावणी करून व गावात चोरी झाली असून तुमचे दागिने बघायचे आहेत असे सांगून एक लाखांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन गेल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सुमित्रा सोन्गार या वावंजे येथे राहतात. घरी असताना त्यांच्याकडे आलेल्या एका व्यक्तीने आपण रत्नागिरीमधील पोलीस असून वावंजे गावात सकाळी चोरी झाली असल्याचे सांगितले. तसेच तुमच्याकडील सोन्याच्या दागिन्यांची तपासणी करायची आहे, असे सांगत त्यांचे मंगळसूत्र ताब्यात घेतले. तसेच दागिन्यांच्या पावत्याही मागवून घेतल्या व सोन्याचे दागिने आपल्याकडे घेत पोलीस स्टेशनला येऊन भेटा, असे सांगत दुचाकीवर बसून निघून गेला. पोलीस तोतया असल्याचे समजल्यानंतर सुमित्रा यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला.