| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची निवडणुक 7 एप्रिल रोजी होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर विशेष सर्वसाधारण सभा त्याच दिवशी ठीक 12:00 वाजता पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा नगरी सभागृह बालेवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेत चौवार्षिक (2024 ते 2028) निवडणुकीचे निकाल जाहीर केले जाणार असून सभेला सर्वांनी वेळेवर उपस्तीत राहण्याचे आवाहन चंद्रजीत जाधव व गोविंद शर्मा यांनी केले आहे. या सभेला सुधांशु मित्तल व एम. एस. त्यागी यांची विशेष उपस्थिती असणार आहे.