। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत सनरायझर्स हैदराबाद संघाने फलंदाजीच्या आघाडीवर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. संघाकडून डावाची सुरुवात करणारा युवा डावखुरा फलंदाज अभिषेक शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये फलंदाजी करताना दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यातही सनरायझर्स हैदराबाद संघासमोर 166 धावांचे लक्ष्य असताना अभिषेकने सुरुवातीलाच 300+च्या स्ट्राइक रेटने केवळ 12 चेंडूत 37 धावांची खेळी करत सामना एकतर्फी केला. मात्र, अभिषेकच्या या शानदार खेळीनंतरही भारताचा माजी खेळाडू आणि सिक्सर किंग म्हणून ओळखल्या जाणार्या युवराज सिंगने त्याला आऊट होण्याच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली.