। मुंबई । प्रतिनिधी ।
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात अखेर मुंबई इंडियन्सने पहिल्या विजयाची नोंद केली. या सामन्यात मुंबईच्या जवळपास सर्वच खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. पण हार्दिक पांड्याने यावेळी एकाच खेळाडूचे नाव घेतले आहे. सामन्यानंतर बोलताना हार्दिक पांड्या म्हणाला की, प्रत्येकजण चांगली फलंदाजी करत होता. फक्त आम्हाला विजयाची लय हवी होती, त्या संधीची प्रत्येकजण वाट पाहत होता. आजच्या सामन्यात प्रत्येकानं चांगली फलंदाजी केली. पण रोमारिओ शेफर्डचे नाव मी आवर्जुन घेईन. कारण त्याच्यामुळे आम्हाला हा विजय मिळवता आला, असे मला वाटते. दोन्ही संघाची फलंदाजी पाहिली तर शेफर्ड याने अखेरच्या षटकात केलेली फलंदाजी, हाच फरक जाणवेल. शेफर्डची धडाकेबाज खेळीमुळेच विजय मिळवू शकलो. शेफर्डसारख्या खेळाडूंचा अभिमान आहे. या सामन्यात आमची गोलंदाजीही चांगली झाली. त्यामुळे माझ्यावर गोलंदाजी करण्याची वेळच आली नाही. आमच्यासाठी हा एक दमदार विजय आहे.