। अलिबाग । प्रतिनिधी ।
पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या ‘प्रभाविष्कार’ अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक मराठी शाळा, बी. एड. महाविद्यालयाचा विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून रायगड जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग महारुद्र नाळे, पनवेल नगरपरिषदेचे माजी नगरसेवक, शेकाप नेते गणेश कडू, शेकापचे जेष्ठ नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य द्वारकानाथ नाईक, संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, विविध ग्रामपंचायत सरपंच, सदस्य आदि उपस्थित होते.
याप्रसंगी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रिना म्हात्रे, बी. एड. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली रगडे व इतर प्राचार्य, मुख्याध्यापक, मुख्य कार्यालयाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कारचे सादरीकरण केले.